आरोग्य

महिला शिक्षिकांकडून 10 आॕक्सिजन सिलिंडर ग्रामीण रूग्णालयाला भेट

पाचोरा – येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव व सदाबहार सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आज 28 रोजी पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील covid-19 उपचार कक्षाला दहा जंबो ऑक्सीजन सिलेंडर भेट देण्यात आलेत. मागील सहा महिन्यापासून कोरणा युद्धाच्या लढाईत सर्व पुरुष मंडळी अहोरात्र लढत असताना महिलांचेही योगदान असावे या भावनेतून सदाबहार सखी व्हाॕट्सअप ग्रुपच्या महिलांनी हा अनोखा पराक्रम करून कोरोना युद्धात आघाडी घेतली आहे
रोटरी क्‍लबच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या उपक्रमातील सर्व सदाबहार व्हाट्सअप ग्रुप मधील महिला ह्या जिल्हा परिषद शाळा,खाजगी प्राथमिक,माध्यमिक तसेच उर्दू शाळेच्या शिक्षिका आहेत.सर्वांनी मिळून स्वयंस्फूर्तीने प्रत्येकी 500 रूपये, स्वच्छेने देणगी जमा केली. त्या देणगी चा रक्कमेतुन पाचोरा ग्रामिण रूग्णालय मध्ये उपचार घेत असलेल्या कोवीड बाधीत रूग्णांचा सेवेत 10 जम्बो सिलेंडर लोकार्पण करण्यात आले. लवकरच ऑक्सीजन बेड साकारण्यासाठी रोटरी क्लब या ठिकाणी प्रयत्न करणार आहे.
मुख्य संकल्पना मांडणाऱ्या राजुरी शाळेच्या शिक्षिका अरूणा उदावंत ह्या उपक्रमाच्या प्रोजेक्ट डायरेक्टर होत्या. या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील, सचिव डॉ अमोल जाधव, तहसीलदार श्री कैलास चावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ, डॉ अमित साळुंखे, रो डॉ गोरख दादा महाजन,रो डॉ मुकेश तेली, रो निलेश कोटेचा, सौ स्वाति अमृतराव पाटील,सौ पुष्पलता आंनदराव पाटील, श्रीमती सुवर्णा महाजन, सौ उज्वला महाजन, रोटरी क्लब पाचोरा पदाधिकारी उपस्थित होते. रॉ शिवाजी शिंदे यांचे उपक्रमाला मार्गदर्शन केले. प्रमिला वाघ, गायत्री पाटील यांचे सहकार्य लाभले. दातृत्वाचा अभिनव संकल्पनेत आपल्या उत्पन्नातील खारीचा वाटा देऊन ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सामान्य व्यक्तींचा प्राण वाचवण्यासाठी धावून आलेल्या सर्व संवेदनशील शिक्षिका भगिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.