पालकमंत्री

महेंद्रसिंग (पिंटू)ठाकूर एक आदर्श नगरसेवक -पालकमंत्री गुलाबराव पाटील

भुसावळ- शहरातील दिनदयाल नगरातील विकास कामांचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी व्यासपीठावरून संबोधित करताना पालकमंत्र्यांनी भुसावळ शहरात शासकीय अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या राजकीय गुंडाना तात्काळ तडीपार करण्याचे आदेश प्रांतांना दिलेले आहे. तसेच त्यांनी आपल्या भाषणात विरोधकांच्या वर्तवणूकीवर जोरदार फटकेबाजी करत सर्वच प्रलंबित असलेल्या तडीपारीच्या प्रस्तावावर कोणतीही दयामया न दाखवता तात्काळ निकाली काढण्याचे आदेश दिलेले आहे.

दरम्यान, भुसावळच्या विकासासाठी आपण पालकमंत्री म्हणून सदैव तत्पर असून भविष्यात आणखी कोट्यवधींचा भरघोस निधी देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री यांनी दिले.

तसेच दिनदयाल नगरचे नगरसेवक महेंद्रसिंग(पिंटू) ठाकूर एक आदर्श नगरसेवक असून जिल्ह्यातील इतरांनी आदर्श घ्यावा इतके मोठे त्यांचे कार्य आहे.त्यांनी गेल्या कोरोना काळात संपूर्ण वार्डात घरोघरी जाऊन अन्नदान केलेले होते.तसेच काही महिन्यांपूर्वी वार्डातील नागरिकांसाठी उन्हाळ्यात मोफत शीतपेय मिळण्यासाठी “आरओ” प्रकल्पाचे उद्घाटन केले.सोबत प्रत्येक घरी एक जार मोफत वाटप केला होता.आता छोटे छोटे घर असलेल्या वार्डातील नागरिकांसाठी मोठा पाठपुरावा करून सामाजिक सभागृह बांधलेले आहे. तसेच पालकमंत्री पुढे म्हणाले की, भुसावळ करांच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पण कायम रखडलेल्या अमृत योजनेच्या विकासासाठी आणखी बैठका घेऊन ती पूर्णत्वास नेण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे.
या प्रसंगी आमदार संजय सावकारे,नगराध्यक्ष रमण भोळे यांचेसह सर्व पक्षीय नगरसेवकांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.