आरोग्य

मांजा,नाॕयलान धाग्यांची निर्मिती ,वापर,साठवणूकीवर बंदी- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव – मकर संक्रात या सणाच्या व इतर वेळेस पतंग उडविण्यासाठी प्लास्टीक किंवा इतर कृत्रिम वस्तुपासुन बनविलेल्या नायलॉन मांजाचा वापर मोठया प्रमाणात करण्यात येत असून दोन पतंगामध्ये वर्षन होऊन मोठया प्रमाणात मांजा तुटुन उंच झाडे व इमारतीमध्ये मांजा अडकतो व त्यामुळे वनपक्षी यांचे जिवीतास धोका निर्माण होऊन पशु-पक्षी जखमी मृत होत असतात. पतंगासह तुटल्लेल्या नायलॉन मांजाच्या धाग्यांचे तुकडे जमिनीवर पडुन त्याचे विघटन होण्यासारखे नसल्याने गटारे व नदी-नाल्यासारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात. तसेच गाय अथवा तत्सम प्राण्यांनी नायलॉन मांजाचे तुकडे समाविष्ठ असलेले खाद्य सेवन केल्यामुळे त्यांना गुदमरणचा त्रास होतो. अशा प्रकारे सदर मांजा/धाग्यांमधील प्लास्टीकच्या वस्तुमुळे विविध प्रकारचे दुष्परीणाम होत असतात. त्यामुळे पंतग उडवण्याच्या नायलॉन मांजा धाग्यामुळे होणा-या प्राणघातक इजांपासुन पक्षी व मानव यांचे जिविताचे संरक्षण करण्याकामी पर्यावरण (संरक्षण)अधिनियम 1886 चे कलम 5 व 15 अन्वये, नायलॉन मांजाची साठवणुक, विक्री, निर्मीती व वापर करण्यावर इकडील कार्यालयाचे आदेश क्रमांक दंडप्र-01/कावि 2021/01 दिनांक 01 जानेवारी, 2021 अन्वये बंदी घालणेत आलेली आहे. सदर पार्श्वभूमीवर मा.जिल्हाधिकारी यांचेतर्फे खालीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे.
1) मकर संक्रात या सणाच्या व इतर वेळेस पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणा-या प्लास्टीक किंवा इतर कृत्रिम वस्तुपासुन बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्य पक्कया धाग्याच्या निर्माती, विक्री, साठवणुक व वापर करण्यास संपूर्ण जळगांव जिल्हयात कायमस्वरुपी बंदी घालण्यात आलेली असल्याने सदर नायलॉन मांज्यांची खरेदी विक्री करण्यात येवू नये.
2) जळगांव जिलयातील सर्व घाऊक व्यापारी/किरकोळ व्यापारी/साठवणूकदार यांनी नायलोन मांजाची विक्री व साठवणुक करण्यास प्रतिबंध करण्यात यावा.
3) सदर आदेशाची अंमलबजावणी न केल्यास सदर बाब ही पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 चे कलम 15 अन्वये शिक्षेस पात्र राहीन.असे आदेश आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढलेले आहेत.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.