कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलेल्या आवाहनाला भाजप नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रतिसाद देत पिठोरी अमावस्येला आपल्या घरी अगदी साध्या पद्धतीने बळीराजाच्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करत बळीराजाची पूजा करून पोळा साजरा केला. याप्रसंगी माजी महसूलमंत्री एकनाथरावजी खडसे म्हणाले की कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता यावर्षी शेतकरी बांधवांनी गर्दी न करता अगदी साध्या पद्धतीने बळीराजाचा पोळा सण साजरा केला.याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे, महाराष्ट्र दूध संघ महानंदा अध्यक्षा सौ.मंदाताई एकनाथराव खडसे, जिल्हा बँक चेअरमन सौ.रोहिणीताई खडसे-खेवलकर व कुटुंबीय उपस्थित होते.