राजकीय

माझा व माझ्या कुटुंबाचा कोरोना हा खराखुरा कोरोना- माजी मंत्री आ. गिरीष महाजन

जळगाव दिः30 – कोरोनातून बरे झाल्यानंतर पहिल्याच दिवशी भाजपा नेते माजी जलसंपदा मंत्री आ.गिरीश महाजन यांनी आज रोजी जळगाव येथील कोव्हिड रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे, आ.चंदुभाई पटेल हेही उपस्थित होते.

कोव्हिड रुग्णलयात पाहणी केल्यानंतर आ. गिरीश महाजन माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहेत, त्याच बरोबर जळगाव जिल्ह्यात देखील कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात स्थिती अतिशय गंभीर बनली असून पुरेशा उपाय योजना नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
कोरोना बाधित रुग्णांना इथे कुणी विचारायला तयार नाही, बेड्स नाही, व्हेन्टिलेटर नाहीत, ऑक्सिजन बेड्स नाहीत अशी गंभीर परिस्थिती उद्भवलेली असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होताहेत, सरकार याबाबत गंभीर नसून त्यांचे याकडे लक्ष नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला.
राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या सारख्या युवा नेत्याला कोरोना कसा झाला ? या वक्तव्याची आठवण महाजन यांनी यावेळी करून दिली असता श्री.महाजन म्हणाले की, माझा कोरोना हा खराखुरा असून ईडीचा कोरोना नाही. मी खोटे नाटे सर्टिफिकेट घेतलेले नाही, माझ्यासह कुटुंबातील सदस्यांना कोरोना लागण झाल्याचे सांगत त्यांनी याप्रसंगी टोलेबाजी केलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.