राजकीय

माणसाच्या जीवापेक्षा काहीच मोठे नाही- राजेश टोपे आरोग्यमंत्री

मुंबई दि-30 राज्यावर घोंघावणाऱ्या लॉकडाऊनच्या संकटावर आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मोठे विधान केलेले असून लाॕकडाऊन हा मुख्यमंत्र्यांनाच काय राज्यातील कोणत्याच व्यक्तीला नको आहे. मात्र, तशी वेळ आल्यास  लॉकडाऊनचा  पर्याय हा अंतिम असून तो अमलात आणावाच लागतो. कारण, माणसाच्या जीवापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नसते. लॉकडाऊनच्या निर्णयावरुन महाविकासआघाडी सरकारमधील पक्षांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. लॉकडाऊन हा कोणालाही प्रिय नसतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही तशी इच्छा मुळीच नाही. महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीला पुन्हा लॉकडाऊन लागावा, असे वाटत नाही. पण आपल्याकडे ” तहान लागल्यावर विहीर खोदायची ” अशी एक म्हण आहे. तशी बिकट परिस्थिती ओढावू नये म्हणून आपण तयारी करत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात दररोज 35 ते 40 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असेल तर तशी बेड्सची व्यवस्था आहे का, हे पाहावे लागेल. रूग्णसंख्येच्या प्रमाणात बेड्स कमी पडत असतील तर लॉकडाऊनसारखा पर्याय वापरावा लागेल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

लॉकडाऊन मुळीच परवडणार नाही, मात्र असंघटित कामगारांकडे लक्ष पुरविणार’

लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. मात्र, वेळ पडल्यास विचार करायला हरकत नाही. मात्र, गेल्यावेळप्रमाणे लॉकडाऊन सरकारला परवडणार नाही. असंघटित कामगार आणि उद्योगधंद्यांना आपल्याला बेरोजगार करायचे नाही. सध्या आम्ही असंघटित कामगार आणि उद्योगांवर कशा पद्धतीने निर्बंध लादून काम सुरु ठेवता येऊ शकते, याचा विचार करत आहोत. आपण सरकारी आणि खासगी कार्यालयात 50 टक्के कर्मचारी ठेवण्याचे आदेश यामुळेच दिलेले आहेत. कोरोनाची साखळी तोडून रुग्णांची संख्या कमी करणे, आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच लसीकरणाच्या मोहीमेत देशभरात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. हा लसीकरणाचा वेग अधिक वाढवायचा आहे. सर्व राजकीय पक्षांना, सामाजिक कार्यकर्त्यांना मतदानाला मतदार काढतो त्या पद्धतीने त्यांनी वॉर्ड स्तरावर आपापल्या बूथवरून त्यांना मतदानाला घेऊन जातो त्या पद्धतीने सर्वांना लसीकरणात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.
राज्यात व्हेंटिलेटर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. व्हेंटिलेटर राज्यातल्या सगळ्या रूग्णालयात उपलब्ध आहेत. ऑक्सिजनची मागणी वाढत असल्यामुळे आम्ही 80 टक्के निर्माण होणारा ऑक्सिजन आरोग्य सेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे ठोस आश्वासन राजेश टोपे यांनी दिलेले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.