Crime

मारहाणीत एकाचा खून, फिर्यादीच निघाला आरोपी, तिघांवर गुन्हा दाखल

चोपडा- दि- ०५/०१/२०२१ रोजी लासुर येथील प्रदिप उर्फ आबा जगन्नाथ माळी हा चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आला असता त्याने सांगितले की, दि.०४/०१/२०२१ रोजी रात्री १०.०० वाजेचे सुमारास लासुर गावी राहणारा रतीलाल जगन्नाथ माळी हा एक महिला तीचे घरात एकटी असल्याचा फायदा घेवुन तिच्याजवळ जावून झोपला या कारणावरून सदर महिलेचे दिर मंगेश नवल महाजन, विकेश नवल महाजन, तसेच भुषण कैलास मगरे, दादु राजेंद्र साळुखे यांनी रात्री ००.४५ वा. रतीलाल जगन्नाथ माळी हा दारु पिवुन घरात झोपलेला असतांना त्याला लाथा बुक्यांनी व काठीने मारहाण केली त्यात रतिलाल हा मरण पावला आहे,अशी फिर्याद दिल्यावरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुरनं. ०४/२०२१ भादवि ३०२, ४५२, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे दाखल करण्यात येवून गुन्ह्याचा तपास सपोनि. संदिप आराक यांनी हाती घेवुन तात्काळ स्टापसह घटनास्थळी रवाना होवुन तपासाची सुत्र फिरवली. फिर्यादीने सांगितलेल्या संशयीतांना तात्काळ ताब्यात घेवुन आरोपी मंगेश नवल महाजन,विकास उर्फ विकेश नवल माळी यांना अटक केली आहे. तसेच घटनास्थावर फॉरेन्सीक पथकाला पाचारण करून पुरावे गोळा केले. सदर गुन्ह्याचा तपास करीत असतांना डॉ.प्रविण मुंढे,पोलीस अधिक्षक जळगाव,यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून तपासाबाबत सुचना दिल्यात तसेच सचिन गोरे अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगाव परीमंडळ व राजेंद्र रायसिंग उपविभागीय पोलीस अधिकारी चोपड़ा भाग यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देवुन तपासाबाबत सखोल सुचना दिल्या त्यानुसार गुन्ह्याची तपास करत असतांना तपासलेले साक्षीदार व मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील फिर्यादी प्रदिप उर्फ आबा जगन्नाथ माळी याचे रतीलाल याने यापुर्वी देखील महिलांची छेड काढली होती. त्यामुळे फिर्यादी याचे लग्न जमत नव्हते तसेच गल्लीत व गावात बदनामी झालेली होती याचा मनात राग धरुन त्याने देखील रतीलाल यास भांडणात छातीत, मानेवर, गुप्तांगावर लाथाबुक्यांनी मारहाण केली असलेबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाबात निष्पन्न झाल्याने फिर्यादी हा सुध्दा आरोपी असल्याने त्याचे विरूध्द पुरावे उपलब्ध झाल्याने त्यास आज रोजी गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि, संदिप आराक यांनी केला असुन तपासात पो.उप निरीक्षक अमर विसावे, पोहेकॉ. २५३ भरत नाईक, पोहेकॉ. राजू महाजन, पोहेकॉ. सुनिल जाधव, पोना, संदिप धनगर, पोना, विकास सोनवणे, पोना. विष्णु भिल, पोना, रितेश चौधरी, पोकॉ. सुनिल कोळी, पोहेकॉ.ईशी यांनी मदत केली असून पुढील तपास करीत आहेत.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.