Crime
मालवाहतूक रिक्षाच्या धडकेत भुसावळचा दुचाकीस्वार जागीच ठार,एक गंभीर

जामनेर : पहुर येथून भरधाव वेगाने येत असलेल्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या मालवाहतुक करणाऱ्या रिक्षाने जोरदार धडक दिली. सदरील अपघात हा सोमवार दि-21/12/2020 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास जामनेर येथील रेल्वे गेटजवळ घडला.या घटनेत दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झालेला असून दुसऱ्या जखमीस जळगावला हलविण्यात आलेले आहेत. या अपघातात स्वप्नील राजू गाढे (वय, 30) हा तरूण जागीच ठार झालेला आहे.तर मनीष बोरसे (वय ,20) दोन्ही राहणार भुसावळ हे जखमी झाल्याने त्याला गोदावरी हॉस्पिटलला हलवण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच भाजपचे कार्यकर्ते जितू पाटील यांनी लागलीच पोलीसांना या घटनेची माहिती दिली व दोघांना तातडीने रुग्णवाहिकेने उप जिल्हारुग्णालयात हलवले. पोलिसांनी पंचनामा करुन नोंद घेतली.या घटनेतील मालवाहतुक रिक्षा जप्त करण्यात आलेली आहे.