मी कधीही संपणार नाही- माजी मंत्री एकनाथरावजी खडसे

दि-05/09/2020 भाजपचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी आज एका मराठी वृत्त वाहिनीला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत असंतोषाला मोकळी वाट करून दिलेली आहे.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खडसे यांनी आज अप्रत्यक्षपणे घाणाघाणी टिका केली. मी कोणतेही उपद्व्याप केले नाहीत. माझ्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नसताना एका मनीष नावाच्या अभियंत्याच्या मदतीने टेक्निकली करामती करत मला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केला गेला.जमिन घोटाळा , दाऊदच्या बायकोशी संभाषणाचे आरोप आणखी विविध आरोप करून बदनाम करण्यासाठी काही विशिष्ट लोकांनी मिडिया ट्रायल केली गेली ,आणि हे कोणी केले हे अख्खा महाराष्ट्र ओळखून आहे ,असेही खडसे यांनी सांगितले.माझ्यावर केले गेलेले आरोप सिद्ध होऊ शकलेले नाहीत.कारण ते कट कारस्थान रचून केलेले खोटे आरोप होते. मी त्यावेळी मुख्यमंत्रिपदाचा प्रबळ दावेदार व प्रतिस्पर्धी असल्यामुळेच खडसेंना संपविण्याचा कट रचला गेला. परंतु नाथाभाऊ हे पदावर असो वा नसो ते कधीही संपणार नाहीत. ज्यांना मी ओळख दिली ,मोठे केले,प्रामाणिकपणे संधी दिली त्यांनीच मला हटविण्याचा प्रयत्न केला. माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनात मी खूप कष्ट केले मेहनत केली. माझ्यावर एकही खोटा आरोप,आक्षेप माझ्यावर झाला नाही. परंतु काही नेत्यांच्या प्रवृत्तीमुळे भाजपाचे सरकार येऊ शकले नाहीत असा आरोप खडसे यांनी केलेला आहे.