ठाणेनिवडणूकमुंबईराजकीय

मी राजीनामा द्यायला तयार आहे मात्र समोर येऊन सांगावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांना खणखणीत इशारा

मी राजीनामा द्यायला तयार आहे मात्र समोर येऊन सांगावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांना खणखणीत इशारा

मुंबई- बंडखोर आमदारांनी सांगावे मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, मात्र जर शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार असेल तर ते मला मान्य आहे. मात्र बंडखोर आमदारांनी मला समोर येऊन स्पष्ट सांगावे असे आवाहन मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना उद्देशून केलेले आहे. आज सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतातील जनतेला फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संवाद सर्व आपल्या मनातील भावना मोकळ्या केलेल्या आहेत.तसेच त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की मी हिंदुत्व सोडलेलं नसून मुख्यमंत्री पद हे मला शरद पवार साहेबांनी सांगितल्या वरूनच मी घेतलेलं एक जबाबदारीच आणि महत्वाचं पद होतं. मला प्रशासनाचा कोणताही अनुभव नसताना मला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह शिवसैनिकांनी सुद्धा सरकार चालविण्यासाठी सहकार्य केले आहे. तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा खूप मोठे सहकार्य मला केले असून त्यांचा मी कायम ऋणी राहील. त्यांच्यामुळेच मी विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून जनतेच्या हिताची कामे करू शकलेलो आहे.
मी आता या फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून त्या गायब झालेल्या आमदारांना आवाहन करतो कि, त्यांनी मला लवकरात लवकर त्यांचा निर्णय कळवावा की मी मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा कधी द्यायचा ? असा संदेश मुख्यमंत्र्यांनी फेसबूक Live च्या माध्यमातून केलेला आहे. आता सायंकाळी 7 वाजता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेवर काय प्रत्युत्तर देतात , याकडे साऱ्या महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून आहे. ते आसामची राजधानी गुवाहाटी येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.