वृत्तविशेष

मुंबईतील राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन –मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि:११एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला सुंदर झाडं, ज्याला शहरातील जंगल असं देखील म्हणता येईल. याने हे राजभवन अधिकच सुंदर झाले आहे. देशातील हे सर्वोत्तम राजभवन आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, ब्रिटीश गव्हर्नरचे हे चौथे निवासस्थान होते. या वास्तुने १०० वर्षाहून अधिक काळात घडलेल्या घडामोडी पाहिल्या आहेत. दि ३० एप्रिल १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाचे अनावरण तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी याच वास्तूत केले होते. ही नवीन रुप धारण केलेली वास्तु आहे. यात पुरातन आणि नवीनता याचा योग्य संगम साधला गेला आहे.
यापुर्वी विरोधीपक्षात असताना या राजभवनमध्ये येण्याचा योग आला असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनी शिवसेनाप्रमुखांना इथे बोलावले होते, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटण्यासाठी राजभवनवर आल्याच्या आठवणी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या.
आधुनिकता अंगी बाळगत असताना संस्कृती जपणे, जुन्या नव्याचा समतोल साधणे गरजेचे आहे. पारतंत्र्यांच्या घटनांची आठवण जपणारी वास्तू सशक्त लोकशाहीचा वारसा पाहण्यासाठी सज्ज झाली आहे. या वास्तूत आनंददायी घटना घडत राहतील अशी अपेक्षा श्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.


राजभवन– पार्श्वभूमी
दिनांक ८ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते नव्या दरबार हॉलचे उदघाटन निश्चित झाले होते. परंतु तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या आकस्मिक निधनामुळे उदघाटन सोहळा स्थगित करण्यात आला होता.
राजभवनातील नवीन दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरचबांधण्यात आला असून त्याची आसन क्षमता ७५० इतकी आहे. जुन्या हॉलची आसन क्षमता २२५ इतकी होती.
जुन्या दरबार हॉलची हेरिटेज वैशिष्ट्ये कायम ठेवताना नव्या सभागृहालाबाल्कनी तसेच समुद्र दर्शन घडविणारी गॅलरी ही अतिरिक्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजभवनातील दरबार हॉल शपथविधी सोहळे,शासकीय कार्यक्रम, पोलीस अलंकरण समारोह, शिष्टमंडळाच्या भेटी तसेच लहान मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे स्थळ म्हणून ओळखला जाऊ लागला.
इंग्लंडचे महाराजे पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या १९११ मध्ये झालेल्या भारत भेटीच्या वेळी दरबार हॉल बांधण्यात आला होता.त्याची वास्तू रचना तत्कालीन वास्तुरचनाकार जॉर्ज विटेट यांची होती.
शंभर वर्षांहून अधिक काळ लाटाव वादळ-वाऱ्यांचे तडाखे सहन केल्यामुळे पूर्वीचा दरबार हॉल अतिशय जीर्ण झाला होता. त्यामुळे २०१६ नंतर त्याचा वापर थांबविण्यात व कालांतराने त्याजागी नवा अधिक क्षमतेचा दरबार हॉल बांधण्याचा निर्णय झाला.
नव्या दरबार हॉलचे बांधकाम २०१९ मध्ये सुरु झाले. मात्र कोविडच्या उद्रेकामुळेबांधकामाची गती मंदावली कालांतराने बांधकाम पुनश्च सुरु झाले व डिसेंबर २०२१ मध्ये हॉल बांधून पूर्ण झाला.
दरबार हॉलचा इतिहास
दरबार हॉल हे आयताकृती सभागृह सन १९११ मध्ये बांधण्यात आले होते. राज्यपालांचे निवासस्थान असलेली’जलभूषण’ ही वास्तू तसेच राज्यपालांचे सचिवालय यांच्या मधल्या जागेत दरबार हॉल बांधण्यात आला.
दरबार हॉलच्या भव्य पोर्चच्या दर्शनी भागातजमिनीखाली राजभवनातील ऐतिहासिक तळघराचे (बंकर) प्रवेशद्वार आहे. इथून नागमोडी वळणे घेत हे तळघर ‘जलचिंतन’ या अतिथीगृहाखालून उघडते.
दिनांक १० डिसेंबर १९५६ साली श्री प्रकाश यांनी जुन्या द्विभाषिक मुंबई राज्याच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली त्यावेळी दरबार हॉलचे नाव’जल नायक’ असे होते.
दरबार हॉलच्या समोरील आणि मागील बाजूंना’जीवन वृक्ष’ ही संकल्पना असलेली सिल्क वस्त्रावर केलेली मोठी पेंटिंग्स होती.
बदलत्या सामाजिक राजकीय परिस्थितीत राज्यपालांना विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागते. त्यामुळे’दरबार हॉल’ किंवा ‘जल सभागृह’ हा राजभवनातील सर्वात व्यस्त परिसर असतो.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.