मुंबई

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा | पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच | मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

मुंबई:  मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकुळ घातलेला आहे.मुंबईतील सर्वच भागात काल रात्रभर पावसाची संततधार सुरूच असून पुढच्या पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला जोरदार पाऊस आजही कायम आहे. रात्रभर धो-धो पाऊस सुरू आहे. तसंच पहाटेपासून मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. 

मुंबईत आज अतिवृष्टीचा अंदाज


आज आणि उद्या मुंबईत अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.आज काही ठिकाणी 200 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्येही येत्या 3-4 तास जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. आज पहाटे साडेपाच पर्यंत कुलाबा वेधशाळेत 95.4 मिमी तर सांताक्रुझमध्ये 96.4 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
या ठिकाणी साचलं पाणी 
अंधेरी सबवे वाहनांसाठी आणि नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे.दररोज सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी साचलं आहे. याव्यतिरिक्त बोरीवली, माटुंगा, वरळी, सायन भागातही काही प्रमाणात पाणी साचलं आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत.यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे.
लोकल सेवेवर परिणाम नाही 
मुंबईत गेले तीन चार दिवस मुसळधार पाऊस असला तरी पावसामुळे लोकल सेवेवर मात्र अजिबात परिणाम झालेला नाही. सध्या मुंबईतील मध्य रेल्वे ,हार्बर आणि पश्चिम रेल्वे या तीनही मार्गांवर लोकल ट्रेन सुरू असून 15 ते 20 मि उशिराने धावत आहे.तर हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरही रेल्वे वाहतूक उशिराने धावत आहे. 
मुंबईत जोरदार पावसाची नोंद 
सध्या मुसळधार पावसामुळे मुंबईत जुलै महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांमध्ये सांताक्रूझ येथे 634.3 मिलीमीटर, तर कुलाबा येथे 481.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत मंगळवार, बुधवार असे दोन दिवस पावसानं जोरदार बॅटिंग केली. दिवसभर मुसळधार पाऊस पडल्यानंतर रात्री ही पावसाची जोरदार बॅटींग सुरूच आहे. 

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.