मुंबईत बेस्ट बसचे तिकीट काढणे झाले आणखी सोपे, टॅप इन टॅप आऊट सेवेचे उद्घाटन

मुंबई दि-21 महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज गेटवे ऑफ इंडिया ते चर्चगेट या बसेसच्या मार्गावर टॅप-इन टॅप-आउट (Tap-in Tap-out) सेवेचे उद्घाटन केले आहे.यामुळे बससे टिकिट काढणे आणखी सोपे झालेलं आहे.
अशा प्रकारची सेवा देणारी बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ही भारतातील पहिली बस सेवा असणार आहे जी पूर्णपणे डिजिटल होणार आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे. आम्ही काही दिवसांत या मार्गावरील सर्व 10 बसेसमध्ये याची अंमलबजावणी करणार आहोत आणि नंतर सर्व 438 मार्गांवर त्याचा विस्तार करणार आहोत, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
टॅप-इन टॅप-आउटचा वापर कसा करावा
या बसेस मधून कंडक्टर कमी केले जातील म्हणून प्रवाशाने ड्रायव्हरच्या बाजूने टॅप करणे आवश्यक असणार आहे. कंडक्टर बस स्टॉपवर उभे असतील जेणेकरुन लोकांना कागदी तिकिटे खरेदी करण्याचा पर्यायही उपलब्ध होईल. “बसमधून बाहेर पडताना जर कोणी टॅप केले नाही तर त्या मार्गावरील जास्तीत जास्त रक्कम तुमच्या कडून घेतली जाणार,” असे बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
बेस्ट बसेसमध्ये कार्ड रीडर बसवले जातील ज्यावर प्रवाशांनी फक्त टॅप करावे लागणार आहे. सुरुवातीला ती संपूर्ण मुंबईतील ‘रिंग रुट्स’वर धावणार आहे, जवळपास 600 वातानुकूलित बसेस आहेत, ज्यात मिनी आणि टेम्पो ट्रॅव्हलर्सचा देखील समावेश आहे. तर त्या बेट शहर आणि उपनगरात रिंग रूटवर चालतात.
या बसेस 174 अशा विविध मार्गांवर धावतात ज्या की प्रवाशांना रेल्वे स्थानकांपासून मुंबईतील विविध ठिकाणी निवासी भागात घेऊन जातील. या रिंग रूट्सवरून प्रवास करणाऱ्या लोकांना संवाद साधण्याची किंवा कंडक्टरची वाट पाहण्याची गरज नाही.
रिंग रूटवर धावणाऱ्या या बसेस एकतर एसी बससाठी 6 रुपये आणि नॉन एसी बससाठी 5 रुपये निश्चित भाडे आकारणार आहेत. बसेसमध्ये रीडर मशिन्स असतील जी NCMC कार्ड आणि चलो मोबाईल अॅपवर खरेदी केलेली तिकिटे दोन्ही वाचू शकणार आहेत. दीर्घकाळात, लांब मार्गावरील बसमध्येही ही सुविधा असेल ज्याद्वारे प्रवासी टॅप करणे विसरल्यास त्या मार्गावरील जास्तीत जास्त रक्कम ट्रिपच्या शेवटी कापली जाणार आहे.