आरोग्य

मुंबईत CBI चे 68 अधिकारी कोरोनाबाधीत ! मात्र “ED” पासून कोरोना लांब

मुंबई (वृत्तसंस्था) – संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवलेला असून आज राज्यात तब्बल 41434 नवे कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे. राज्यासह मुंबईत दिवसागणिक वाढणारी कोरोनाबाधीतांची आकडेवारी चिंताजनक पातळीवर पोहोचलेली आहे. अशातच आज एक आगळी वेगळी बातमी समोर आलेली असून याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या सात दिवसांमध्ये मुंबईतील सर्वात सर्वच मोठ्या हॉस्पिटल मधील तीनशेच्या वर डॉक्टर पाचशेच्या वर नर्सेस, इतर वैद्यकीय कर्मचारी , अनेक आमदार ,मंत्री व सनदी अधिकारी कोरोनाबाधित झालेली असतानाच आज मुंबईतील भागातील सीबीआयच्या कार्यालयातील तब्बल 68 अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आलेली आहे. याबाबत ANI या वृत्तसंस्थेने मुंबई महापालिकेच्या हवाल्याने ट्विट करून माहिती दिलेली आहे. यामुळे महत्त्वाच्या उच्चपदस्थ शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यातील विशेष बाब म्हणजे यातील सर्व कर्मचारी त्यांनी कोव्हिडचे दोन्ही डोस घेतलेले असल्याची माहिती समोर आलेली आहे.
मात्र आपल्या धडाकेबाज कारवाईने नेहमी चर्चेत असणाऱ्या अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि एनसीबी या शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती अजून समोर आलेली नाही.

https://twitter.com/ANI/status/1479823749234843648?t=GGGY9xPvGJIxBp_qsPJU2A&s=08
मात्र कोरोनाचा वाढता प्रसार पाहता कोरोना लवकरच यांच्या कार्यालयात धडक देण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.