क्राईम

मुंब्र्याचे 30 कोटींचे हेराफेरी प्रकरण ! तोतया आयकर अधिकारीही घेताय मागोवा ? व्यापारी फरार ? गुढ वाढले

ठाणे दि-15 काही दिवसांपूर्वी मुंब्रा पोलिसांनी मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी येथील फैजल मेमन या व्यापाऱ्याच्या घरावर मध्यरात्री टाकलेल्या धाडीत 30 कोटी रुपयांची रोकड आढळून आली होती. या रकमेपैकी 6 कोटी रुपये उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी परस्पर काढून घेत संबंधित व्यापाऱ्याला हाकलून दिले होते. याबाबत काही दिवसांनी एक कथीत पत्र व्हायरल झाल्यानंतर मुंब्रा पोलिसांच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणावर टीका होत होती.अखेरीस याबाबत ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी पोलिस निरीक्षक गीताराम शेवाळे, उपनिरीक्षकांसह 10 जणांना निलंबित केलेलं आहे. तसेच मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांचीही चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. यामुळे ठाणे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडालेली आहे.
व्यापारी फैजल मेमन फरार ?
मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी येथील घरावर धाड टाकण्यात आलेले फैजल मेमन हे मुंबईसह ठाणे, भिवंडीमध्ये लहान मुलांच्या खेळण्यांचे व्यापारी असून बांधकाम व्यावसायिकही असल्याचे सांगण्यात आलेलं आहे. एवढी 30 कोटींची प्रचंड रोकड घरात बाळगल्यामुळे तो आता आयकर विभागाच्या रडारवर आलेला आहे‌. तसेच त्याच्याकडे अजूनही कोट्यवधींचा दोन नंबरचा माल असल्याची चर्चा मुंब्र्यातील त्याच्या राहत्या परिसरातील नागरिकांमध्ये सुरू आहे. यासंबंधी या झोन 1चे उपायुक्त अविनाश अंभोरे यांचे विशेष पथक गेल्या दोन दिवसांपासून बॉम्बे कॉलनीतील या संबधीत व्यापाऱ्याच्या घरी तपासाकामी सतत गेले असता तो घरी मिळून आला नसल्याची माहिती समोर आलेली आहे. तो “त्या” दिवसापासून ती कथीत 24 कोटींची रोकड घेऊन आयकर विभागासह इतर यंत्रणांच्या धाकाने कुटुंबासह फरार झाल्याचे बोलले जात आहे.
तोतया आयकर अधिकारी मागावर ?
पोलिसांचे विशेष पथक गेल्या चार दिवसांपासून बॉम्बे कॉलनीतील या संबधीत व्यापाऱ्याच्या घरी अनेकदा तपासाकामी गेले असता त्यांना या परिसरातील नागरीकांनी काही सुटबुटातील व्यक्ती आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून या व्यापाऱ्याचा ठावठिकाणा विचारत आहे. मात्र काही नागरीकांनी त्यांना “आपका आयडी दिखाओ ? ” असे विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत काढता पाय घेतल्याची माहिती पोलिसांना दिलेली आहे. त्यामुळे “ते” तोतया अधिकारी “वाहत्या गंगेत हातसाफ” करण्यासाठीच मागोवा घेत असल्याची चर्चा या परिसरात रंगू लागली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.