मुक्ताईनगरजवळ जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड, 5 लाख 61 हजाराचा मुद्देमाल जप्त

मुक्ताईनगर- तालुक्यातील खामखेडा रस्त्यावर एका शेतामध्ये जुगार अड्डा चालू असल्याची गुप्त माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी धाड टाकली. या धाडीत 2 लाख 80 हजार रुपये रोख रक्कम यासह 6 हजार रुपयाची विदेशी दारू तसेच पाच मोटर सायकल असा एकूण 5 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल नाईक यांच्यासह त्यांच्या पथकातील विकास वाघ ,संजय हिवरकर ,दीपक चौधरी , राजेश मेढे, रवी नरवाडे, रमेश चौधरी, प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर, प्रमोद लाडवंजारी ,निशांत तडवी ,यांच्या पथकाने काल सायंकाळी जुगार अड्ड्यावर धाड टाकली. याप्रसंगी अजय अरुण जावरे, मनोज नामदेव जाधव,निलेश लीलाधर वाणी ,विनोद ज्ञानदेव कांडेलकर ,निलेश कडू तळेले, राजेश प्रकाश जावरे, शेख बिस्मिल्ला शेख सांडू ,विठ्ठल कडू तळेले अशा आठ जणांविरुद्ध कारवाई करत त्यांना अटक करण्यात आलेली असून त्यांचे विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता झालेली आहे.