क्राईम
मुक्ताईनगरजवळ दोन पुरूषांचे कुजलेले मृतदेह आढळले


शेतशिवारातील गाडरस्त्यावरील झुडुपात दोन अनोळखी पुरूषांचे कुजलेले मृतदेह आढळल्याने या परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. हे मृतदेह दिपक कोळी व विजय भोई यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी लागलीच याची माहिती मुक्ताईनगर पोलिस ठाण्याला कळविली.या घटनेची माहिती मिळताच सुरवातीला पोलिस निरिक्षक सुरेश शिंदे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता दोन्ही मृतदेह 80% कुजलेले असल्याचे
निदर्शनास आले. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे ,फॉरेन्सिक लॅबचे पथक, ठसे तज्ञ, आणि श्वान पथकानेही पाहणी केली.तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही पाहणी करून तपासाला गती दिलेली आहे. दिपक कोळी यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तपासाला अधिक गती देता येईल, असे पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी सांगितले.