आरोग्य
मुक्ताईनगर कोव्हिड सेंटरच्या जेवणात अळ्या-एकनाथरावजी खडसे

तसेच या संदर्भात माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी सुद्धा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे तक्रार केलेली आहे कि या कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनाबाधीत रूग्णांना वेळेवर जेवण दिले जात नसून, जे दिले जातय ते अत्यंत नित्कृष्ठ दर्जाचे असून त्यात अळ्या निघालेल्या आहेत. असे अळ्यायुक्त जेवण तहसिलदारांना दाखविलेले असून रूग्णांना पाणी प्यायला सुद्धा वेळेवर मिळत नाही. लहान मुलांना वेळेवर दूध मिळत नसल्याने याची सखोल चौकशी करून कारवाईची मागणी केलेली आहे.