मुक्ताईनगर जवळ खडसे समर्थकांच्या बॕनरबाजीने खळबळ
मुक्ताईनगर – भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीतील संभाव्य पक्षप्रवेशाच्या चर्चा माध्यमांमधून अनेक दिवसांपासून सुरूच आहेत.मात्र अनेक वेळा स्वतः एकनाथराव खडसे यांनी याबाबत मात्र मला माहीत नसल्याचे यापूर्वी जाहीर केलेले होते. अशातच आता मात्र मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर शहर, पूरनाड फाटा या ठिकाणी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या समर्थकांनी खडसे यांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचे स्वागत करणारे बॕनर लावल्याने खळबळ उडालेली आहे. रस्त्यावर लावलेल्या या बॕनर वरून भाजपचे कमळ चिन्ह गायब करण्यात आलेले आहे. तसेच
“भाऊ ,तुम्ही बांधाल तेच तोरण
तुम्ही ठरवाल तेच धोरण”
आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत. असे या बॕनरवर लिहिलेले असल्याचे दिसून येत आहे. एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांकडून अशा स्वरूपाची बॕनरबाजी सुरू झाल्याने त्यांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचे कार्यकर्त्यांना वेध लागल्याचे संकेत मिळाल्याचे चित्र दिसून येत आहेत. यामुळे एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा वाव मिळाल्याचे दिसून चित्र दिसून येत आहे.