कोर्ट निकालमुंबईराजकीयवृत्तविशेष

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा, देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे नवीन मुख्यमंत्री, तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा, देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे नवीन मुख्यमंत्री, तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे

मुंबई : काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात असल्याचा दावा करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सभागृहात बहुमत चाचणी घेण्याची विनंती केलेली होती. त्यावर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्या बहुमत चाचणी करण्याचे पत्र दिलेले होते.
मात्र ,उद्या विधानसभेत बहुमत चाचणी घेऊन महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याच्या महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या निर्देशाला आव्हान देणाऱ्या शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज सकाळीच दाखल केलेल्या याचिकेवर आजच सायंकाळी सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली होती. शिवसेनेचे वकील अभिषेक सिंघवी यांनी न्यायालयाला सांगितले की, उद्या फ्लोअर टेस्ट घेण्याची नोटीस आज सकाळीच आली आहे. ” बहुमत चाचणी बेकायदेशीर आहे कारण त्यात अपात्रतेचा सामना करणाऱ्या आमदारांचा समावेश होऊ शकत नाही. मी फक्त आज संध्याकाळी यादीसाठी विनंती करत आहे. अन्यथा हे प्रकरण निष्फळ होईल, असा युक्तिवाद त्यांनी आज केलेला होता.
राज्यपालांसाठी उपस्थित असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हे प्रकरण हाती घेण्यास सहमती दर्शवली आणि त्यांना त्यांच्या प्रती देण्याची विनंती केली.फ्लोअर टेस्टसाठी मसरकारला बोलावणे हा राज्यपालांचा विशेषाधिकार आहे. कोणत्याही परिस्थितीत, अपात्रतेचा अर्ज प्रलंबित ठेवण्याचा फ्लोअर टेस्टशी काहीही संबंध नाही. असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटलेलं आहे. दोन्ही बाजूंचा जोरदार युक्तिवाद आज दुपारनंतर कोर्टात सुरू होता, आणी आताच सर्वोच्च न्यायालयाने घोडेबाजार टाळण्यासाठी
बहुमत चाचणी घेणे आवश्यक असल्याचा निर्णय दिलेला आहे. या निकालाकडे अख्ख्या देशाच लक्ष लागून होते.
आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या येणार नसल्याचे जाहीर करून असतात राजीनामा देणार असल्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे महा विकास आघाडीचे सरकार आले असून उद्या भाजप नेते देवेंद्र फडणीस हे भवनात जाऊन राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करू शकणार आहे. त्यांच्याकडे साठी लागणारे संख्याबळ असल्याने त्यांचा नवीन सरकारचा उद्याच शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या सरकारमध्ये भाजपासह शिवसेनेतील शिंदे गट सहभागी होणार असल्याने दोन्ही गटांमध्ये आता मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अडीच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी “मी पुन्हा येईन” अशी घोषणा दिली होती.ती त्यांनी आज खरी करून दाखवलेली आहे.
या नवीन सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असून उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे विराजमान होणार आहे.आता या नवीन मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागते ,याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.मुंबईत खबरदारीचा उपाय म्हणून सर्वदूर केंद्रीय निमलष्करी दलाची पथके तैनात करण्यात आलेली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.