आरोग्य
मुख्य पोस्टात 7 कर्मचारी कोरोनाबाधीत आढळले


जळगाव – जळगाव शहरातील पांडे डेअरी चौकात पोस्टाचे मुख्य कार्यालय असून या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना अॅन्टी रॅपीड टेस्ट घेण्यात आलेली आहे.यात काल 7 कर्मचारी कोरोनाबाधीत आढळून आल्याने खळबळ उडालेली असून कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. दरम्यान आज सकाळपासूनच मुख्य टपाल कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश कार्यालय अधिक्षक यांनी काढलेले आहेत. त्यामुळे पोस्टाच्या ग्राहकांना काही दिवस अडचण येणार आहे. टपाल कार्यालयाच्या कामकाजासाठी पर्यायी व्यवस्था किंवा पर्यायी कर्मचारी उपलब्ध झाल्यावरच कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. यांची ग्राहकांनी नोंद घ्यावी असे आवाहन मुख्य टपाल कार्यालयातर्फे करण्यात आलेले आहे.