आरोग्य

मुलींनी दिला आईला खांदा व अग्निडाग

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील तळई येथील कमलाबाई इच्छाराम महाजन (वय ७०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्याप्रसंगी त्यांच्या सात मुलींनी आईच्या प्रेताला स्वतः खांदा दिला व अग्नी डागही दिला.
दरम्यान तालुक्यातील तळई या गावी इच्छाराम महाजन हे शेती व्यवसाय व विहीर बांधणीचे काम करुन आपला परिवार चालवत होते.त्यांना सात मुली झाल्या व मुलगा झाला नाही. त्या सातही मुलींना इच्छाराम महाजन व स्व.कमलाबाई महाजन यांनी काबाड कष्ट करून मोठं केलं. सातही मुलींचे चांगल्या घरात लग्न करुन दिलं.आज दि २० ऑगस्ट २०२० रोजी कमलाबाई यांचे वृद्धापकाळाने निधन झाले व त्याठिकाणी रंजनाबाई माळी, सुशिला पाटील,अंजना महाजन,अश्विनी महाजन, आशा महाजन,वैशाली महाजन, संगिता महाजन या सात बहिणी एकत्र आल्या व आलेल्या दुःखात खचून न जाता जावई तुकाराम महाजन,वसंत पाटील,चंद्रकांत महाजन,अविनाश सुर्यवंशी,नटराज महाजन,महेंद्र महाजन यांच्या पुढाकाराने व गावातील सरपंच प्रकाश महाजन,समाधान पाटील,देविदास महाजन, इच्छाराम महाजन यांनी मुलींना अग्निडाग व खांदा देण्यासाठी प्रोत्साहन दिले. जुन्या चालिरितीना न जुमानता सहा मुलींनी आईच्या प्रेताला खांदा दिला व लहान मुलगी संगिता महाजन हिने अग्निडाग दिला. याकृती बद्दल गावातील सर्व लोकांनी व नातेवाईकांनी मुलींचे कौतुक करीत प्रोत्साहन दिले.या सात मुलींमधील पाच नंबरची मुलगी पुणे येथे एल.आय.सी.ऑफिस मध्ये नोकरी करते.
फोटो ओळी – एरंडोल तालुक्यातील तळई येथे मृत आईच्या प्रेताला खांदा देताना मुली व प्रेत यात्रेत सामील नातेवाईक व गावकरी.
Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.