कायदे

मोर,गारबर्डी,मंगरूळ,अभोडा धरण प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत

दि-03/09/2020 रावेर यावल तालुक्यातील धरणावर भरपुर प्रमाणावर लोकांची गर्दी होत असल्याने मोर,गारबर्डी ,मंगरूळ, अभोडा धरणावर होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना विषाणुचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता लक्षात घेता फैजपूर विभागाचे प्रांत अजित थोरबोले यांनी पर्यटकास या परिसरात एक किलोमीटर पर्यंत बंदी घातली .
रावेर तालुक्यातील सुकी नदीवरील पाल जवळील गारबर्डी धरण, मंगरूळ ,अभोडा धरण यावल तालुक्यातील हिंगोणा येथील मोर धरण येथे पर्यटकांची गर्दी होत असल्याने , गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धरण व एक कि.मी. अंतरातील परिघाचे क्षेत्र ( Containment Area ) प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात येत आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात (Containment Area ) पूर्णपणे संचारबंदी लागु राहील आणि सदर क्षेत्रात प्रवेश आणि निर्गमन करण्यास बंदी घालण्यात आली आहे त्याचप्रमाणे निंबा देवी,गारबर्डी,मंगरूळ, अभोडा, मोर धरणाच्या प्रतिबंधीत क्षेत्रात ( Containment Area ) मध्ये येणाऱ्या व्यक्तीवर साथरोग प्रतिबंधात्मक कायदा नुसार कायदेशिर कारवाई करण्यात व येणाऱ्या वाहनांवर वाहन अधिनियमाच्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात सदर क्षेत्रात जे व्यक्ती प्रवेश करतील त्यांना १४ दिवस संस्था विलगीकरण करण्यात यावे. तसेच नियुक्त पथकाने सदर क्षेत्रात प्रवेश करनारा कडून ५०० रुपये दंड आकारावा.जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे पालन करावे असे फैजपूर विभागाचे प्रांत अजित थोरबोले यांनी आदेश आज निर्गमित केले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.