मोर नदीपात्रात भुसावळच्या तरुणाचा बुडून मृत्यू

दि-30/08/2020 यावल तालुक्यातील न्हावी जवळील टिळ्या- मोहमांडली शिवारातील मोर नदीपात्रातील कुऱ्हाडी या कुख्यात खोल डोहात बुडून भुसावळच्या तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि भुसावळ येथील सहा ते सात मित्र सहलीसाठी न्हावी जवळील टिळ्या- मोहमांडली घाटा जवळील मोर नदीपात्रात जवळ आले असताना पोहण्यासाठी कुख्यात अशा कुऱ्हाडी या खोल डोहात उतरले असता त्यात विशाल अशोक पवार वय (27) रा.न्यु एरिया वार्ड भुसावळ या तरुणाचा डोहात पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या कुऱ्हाडी डोहात यापूर्वी सुद्धा काही जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या असल्याचे सांगण्यात आले. या तरूणाचा भुसावळ येथे फोटोग्राफीचा व्यवसाय असल्याचे मित्रांकडून सांगण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. सूरदास, हे. कॉ. उमेश पाटील , पो. कॉ. विनोद पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल येथील ग्रामीण रुग्णालय करण्यात आलेले असून याप्रकरणी राकेश राजेंद्र रामटेके यांनी दिलेल्या खबरीवरून फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल राजेश बऱ्हाटे हे करीत आहेत.