मोहफुल व काजूबोंडांपासून बनवल्या जाणाऱ्या दारूला विदेशी मद्याचा दर्जा

मुंबई: काजूबोंडे, मोहफूले यापासून उत्पादित केलेल्या मद्यास विदेशी मद्याचा दर्जा देणारे धोरण राबवणार असल्याचे सरकारकडून आज सांगण्यात आले आहे. या पदार्थांसह फळे, फुले यापासून मद्यार्क उत्पादन व त्यातून विदेशी मद्यनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सरकारच्या या निर्णयाचा फायदा कोकण, नंदुरबार, जळगाव ,चंद्रपूर, कोल्हापूर आदी भागातील आदिवासी नागरीकांना होणार आहे.
मद्य विक्री करणाऱ्या दुकानांची दोन गटात वर्गवारी करण्यात आली. इलाईट आणि सुपर प्रिमियम असे दोन गट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे जी छोटी दुकान आहेत ते आपला दुकानाचा विस्तार करून मद्य विक्रीची कक्षा वाढवू शकतात. 600 चौरस फुटांपर्यंत वाढवू शकतात तर सुपर प्रिमियम 600 चौरस फुटांच्या वरती वाढवता येणार आहे. महसूल वाढवण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
महसूल वाढीसाठी एफएल-2 परवान्यातून अतिउच्च दर्जाची मद्यविक्री परवाना आणि उच्च दर्जाची मद्यविक्री परवाना असे उपवर्ग निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. काजूबोंडे, मोहाच्या फुलांपासून उत्पादित केलेल्या मद्यास विदेशी मद्य असा दर्जा देण्याचा आणि या पदार्थांसह फळे, फुले यापासून मद्यार्क उत्पादन व त्यातून विदेशी मद्यनिर्मिती करण्यासाठी धोरण आखले आहे.