आरोग्य

“म्युकरमायकोसिस”च्या वाढीसाठी कोरोना उपचार पद्धतीला जबाबदार धरणे चुकीचे- डाॕ तात्याराव लहाने कॕबिनेट सचिव

मुंबई दि-21 महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याची चिन्हे दिसत असतानाच आता काळी बुरशी तथा म्युकरमायकोसिस (Mucormycosis) आजाराचे संकटही वाढत चाललेल आहे. महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसमुळे आतापर्यंत १०० रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. या म्युकरमायकोसिसला काळी बुरशी सुद्धा म्हटले जाते. म्युकरमायकोसिसच्या वाढीसाठी कोरोना उपचारांना जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे कॕबिनेट सचिव डॉ तात्याराव लहाने यांनी म्हटलेले आहे.
“म्युकरमायकोसिस कोरोना उपचारांमुळे वाढला असता, तर पहिल्या लाटेतही या आजाराचे रुग्ण वाढले असते” असे तात्याराव लहाने म्हणाले. कोरोना उपचारांमुळे म्युकरमायकोसिस वाढत नाहीय, तर व्हायरसमध्ये म्युटेशन झालय,त्यामुळे हा नवीन स्ट्रेन तयार झालेला आहे.
त्यामुळे म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढता आहेत ,असे तात्याराव लहाने यांनी सांगितले.

“हा नवीन स्ट्रेन स्वादुपिंडाच्या बीटासेलवर परिणाम करतोय. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढतेय. त्यामुळे म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहे ,असे तात्याराव लहाने यांनी सांगितले. “डायबिटीस असलेल्या रुग्णांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढतेय. उपचारामुळे नाही, तर हा व्हायरसचा एक भाग आहे. जितकी स्वच्छता ठेवता येईल आणि स्वच्छ राहता येईल तितका प्रयत्न करा” असे लहाने म्हणाले.
हा म्युकर जमीन, हवेत असतो. तोंडात, नाकावर काळा डाग किंवा डोळ्यांवर सूज दिसली, तर डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला लहानेंनी दिलेला आहे. म्युकरमायकोसिसच्या आजारातून रुग्ण बरे होतात असा दावाही त्यांनी केले. फक्त म्युकरमायकोसिसची औषधे खूप महागडी असल्याचे लहाने यांनी सांगितलेले आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.