राज्य-देश

यापुढे आधार कार्ड प्रींट निघणे बंद, “हा” आहे नवा पर्याय- UIDAI

नवीदिल्ली-आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी भारतीय असल्याचा अधिकृत कायदेशीर पुरावा आहे. घर खरेदीपासून ते सीमकार्ड खरेदी करण्यापर्यंत प्रत्येकाला आधारकार्डची आवश्यकता भासतेच ! कोरोनाची लस घेण्यासाठीही आता आधारकार्डची गरज भासतेय. हे आधार कार्ड आपल्याला आधार कार्ड बनविणारी संस्था Unique Identification Authority of India (UIDAI) मार्फत दिले जाते. ज्यामध्ये आपला फोटो, नाव, वय, पत्ता यांसह अन्य माहिती दिलेली असते. परंतु या आधारकार्ड प्रींट बाबत UIDAI ने मोठी घोषणा केलेली आहे.

UIDAI ने आता आधार कार्डची मोठ्या आकाराची प्रिंट देण्याचा निर्णय रद्दबातल केलेला आहे. यासंदर्भातील माहिती UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत ट्विट केलेले आहे.

यावर UIDAI ने स्पष्ट केलेले आहे की, यापुढे ग्राहकांना मोठ्या आकाराची आधार कार्ड प्रिंट बंद केले आहे. त्याऐवजी एटिएम कार्डच्या आकाराचे PVC आधार कार्ड दिले जाणार आहे. याचा दर 50 रुपये इतका निश्चित केलेला आहे. या PVC कार्डचा आकार ATM कार्ड इतकाच लहान आहे. हे कार्ड आधीच्या आधार कार्डपेक्षा तुलनेने लहान असल्याने खिशात किंवा पॅकेटमध्ये सहज ठेवता येणार आहे. UIDAI ने आपल्या वेबसाइटवरून आधार रिप्रिंट करण्याचा पर्याय देखील काढून टाकलेला आहे.

UIDAI ने ट्विटरद्वारे दिली माहिती

एका व्यक्तीने ट्विटरवर आधारकार्ड हेल्पलाईनवर एक प्रश्न विचारला होता. मी आपले आधारकार्ड रि-प्रिंट करु शकतो का? अशा प्रश्न त्या व्यक्तीने विचारला होता. यावर आधार हेल्पलाईनने उत्तर देत सांगितले की, ही सेवा आता बंद झाली आहे. तुम्ही ऑनलाईन आधार PVC कार्ड ऑर्डर करु शकता.
यूआयडीएआयने एका ट्विटमध्ये ही माहिती दिली
एका व्यक्तीने ट्विटरवर आधार कार्ड हेल्पलाईनला प्रश्न विचारला, “मी माझे आधार पत्र पुन्हा छापू शकतो?” मला वेबसाइटवर कोणताही पर्याय दिसत नाही. त्यास उत्तर देताना आधार मदत केंद्राने सांगितले की ही सेवा आता बंद करण्यात आली आहे. आपण ऑनलाइन माध्यमातून आधार PVC कार्ड ऑर्डर करू शकता.

आधार कार्डला आता नवा पर्याय

UIDAI ने सांगितले की, PVC आधारकार्ड कॅरी करण्यासाठी खूप आहे. याशिवाय जर तुम्हाला आधारकार्ड फ्लेक्सिबल पेपर फॉर्मेटमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही ई-आधारकार्डही मिळवू शकता. याची प्रिंटेड कॉपी देखील आधारकार्डप्रमाणे वैध मानली जाईल.

PVC आधार कार्ड असे बनवा

१) PVC आधार कार्ड आधार कार्ड बनवायचे असल्यास प्रथम UIDAI ची वेबसाइट uidai.gov.in किंवा resident.uidai.gov.in वर जा.
२) त्यानंतर आधारवर क्लिक करा. येथे ‘Order Aadhaar PVC Card’वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक PAGE OPEN होईल.
३) त्या ओपन PAGE वर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, व्हर्चुअल आईडी नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल.
४) यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड किंवा सिक्युरिटी कोड भरावा लागेल, जो एल्फान्यूमेरिक असेल. येथे तुम्हाला एक लहान कॉलम दिसेल जेथे असे लिहिले असेल की मोबाइल नंबर रजिस्टर नाही. त्यावर काळजीपूर्वक टीक करा.
५) आता एक अल्टरनेटिव नंबर टाकावा लागेल ज्यावर तुम्हाला OTP येईल.
६) OTP टाकल्यानंतर आधार रिप्रिंट होईल.
७) यानंतर 50 रुपये शुल्क भरत तुम्ही घरी हे आधार कार्ड ऑर्डर करु शकता.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.