क्राईम

यावलचे मुख्याधिकारी ACB च्या जाळ्यात,यावल शहरात खळबळ


यावल – येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांना कंत्राटदाराकडून लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की , येथील मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यावर आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कारवाई केली . साठवण बंधाऱ्याच्या कामांसाठी एका कंत्राटदाराला काम मिळवून देण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी लाच मागितली होती . संबंधीत कंत्राटदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती . या तक्रारीची खातरजमा करून एक पथक तयार करण्यात आले . या पथकाने आज दुपारी एक वाजेच्या सुमारास यावल येथील नगरपालिकेत सापळा रचला . यात मुख्याधिकारी बबन तडवी यहे २८ हजार रूपयांची लाच घेतांना अडकले . त्यांना या पथकाने रंगेहात अटक केली . अटक करताच त्यांना घेऊन पथक जळगावकडे रवाना झाले . अवघ्या काही मिनिटांमध्ये झालेल्या या कारवाईमुळे नगरपालिका परिसर अक्षरश : हादरला .
यानंतर पथक बबन तडवी यांना घेऊन रवाना झाल्यानंतर याच घटनेचे चर्चा सुरू झाले आहे . मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यावर आधी देखील अनेकदा आरोप करण्यात आले होते . बऱ्याच प्रकरणांमध्ये त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यातआली होती . मात्र आज थेट त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कारवाई केल्याने तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे .

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.