कृषि

यावल तालुक्यातील निमगाव शिवारात बिबट्याचे ठसे आढळले

यावल – यावल तालुक्यातील निमगाव शिवारात पुनश्च एकदा बिबट्याचा वावर दिसून आल्याने परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. यावल वनविभागाने परिसरातील शेतकरी आणी नागरीकांना सर्तक राहण्याचे आवाहन केलेले असून बिबट्याचे अस्तित्व दिसून आल्याची गेल्या 16 दिवसातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी अट्रावल शेतशिवारात एका शेतकऱ्याने बिबट्या दिसल्याचा दावा केला होता. याबाबत सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील निमगाव शिवारातील शेतकरी अरूण जुलालसिंग पाटील यांच्या शेतात आज दिनांक 17 डिसेंबर रोजी नियमीतपणे शेतात गेले होते. शेतातील पिकांना पाणी सोडत असतांना त्यांना आपल्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे मिळून आल्याने या शिवारातील शेती परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निष्पन्न झाले असून अरूण पाटीत यांनी या बाबतची माहिती मोबाईलव्दारे तात्काळ यावल वनविभागाला कळविली असता यावल वनविभाग क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.टी. पदमोर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आर .एस. सोनवने , आणी वनरक्षक ईब्राहीम एस. तडवी यांच्या पथकाने निमगाव शेत शिवारातील पाटील यांच्या शेतात भेट देवून पाहणी करून खात्री केली असता या शेत शिवारात सुमारे आठ वर्षीय बिबट्याचा पदमार्गाचे ठसे असल्याचे वनविभागाच्या पाहणीत निष्पन्न झालेले आहे . यावल वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही .टी. पदमोर यांनी निमगावसह जवळच्या गावातील, परिसरातील शेतकऱ्यांना सर्तक आणि सावधान केलेले असून रात्री शेतात काम करताना दक्षता घेण्याचे आवाहन केलेले आहे .

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.