यावल न्यायालयाच्या कर्मचाऱ्याने केली 14 लाखात फसवणूक, मा.न्यायाधीश फिर्यादी

यावल (प्रतिनिधी )- यावल येथील न्यायालयातील कनिष्ठ लिपिक या पदावर शासकीय नोकरी करीत असताना त्यांचा मुलगा अक्षय विजय सूर्यवंशी याचे डॉक्टर कडून उपचाराचे खोटे बिले व कागदपत्रे तयार करून अनोळखी कर्मचाऱ्यांच्या संगनमताने खोट्या सह्यांची व बनावट कागदपत्रे तयार करून 14 लाख 27 हजार 670 रुपयाची अप्रमाणिकपणे फसवणुक केल्याप्रकरणी येथील प्रथम श्रेणी दिवाणी व फौजदारी न्यायाधीश यांनी यावल पोलिसात फसवणूकीच्या बाबतीत गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ,यावल दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा दंडाधिकारी यांच्या कार्यालयातील कनिष्ठ लिपिक पदावर आरोपी विजय पंढरीनाथ सूर्यवंशी राहणार भुसावळ पुष्कराज अपार्टमेंट सेंटर लाईन्स हायस्कूलचे पाठीमागे यांचा मुलगा अक्षय विजय सूर्यवंशी याचे डॉक्टर अभय एन .सदरे रूबी हॉल क्लिनिक पुणे यांच्याकडील वैद्यकीय औषध उपचाराचे खर्चाचे खोटे बिले व खोटी कागदपत्रे तयार करून रूबी हॉल क्लिनिक येथून अनोळखी कर्मचारी यांच्या सोबत संगणक मत करून खोट्या सह्यांची व बनावट कागदपत्र तयार करून खोट्या सह्यांची प्रत्यक्षात बिलामध्ये नमूद प्रमाणे खर्च झालेला नसताना खोटी वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती खरे असल्याचे भासवून सादर करून वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती रक्कम कार्यालयातून प्राप्त करून कार्यालयाची व शासनाची 14 लाख 27 हजार 670 रुपयांची व अप्रमाणिकपणे फसवणूक केल्याप्रकरणी यावल न्यायालयातील कनिष्ठ लिपिक विजय पंढरीनाथ सूर्यवंशी राहणार भुसावळ पुष्कराज अपार्टमेंट सेंट अलायसेस हायस्कूलच्या पाठीमागे व रुबी हॉल क्लिनिक पुणे येथील अनोळखी इसम यांच्याविरुद्ध यावल येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश तथा दंडाधिकारी प्रथम श्रेणी मा.श्री.दिलीप गंगाधर जगताप यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला भाग 5 गुरं न 191 / 2020 भादवि कलम 420, 465, 468, 471, 167, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ए आय पठाण हे करीत आहेत. न्यायाधीशांनीच कार्यालयीन कर्मचाऱ्याच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याची ही अलीकडच्या काळातील दुर्मिळ घटना आहे.