राष्ट्रीयवृत्तविशेष

या “अजब” व्यक्तीला आजवर 13 वेळा सर्पदंश, हा नागिनचा बदला तर नाही ना ? अशा चर्चांना उधाण

जळगाव- यावल तालुक्यातील दहिगाव येथे एका व्यक्तीसोबत एक विचित्र घटना वारंवार घडत असल्याने या व्यक्तीची जिल्हाभर एकच चर्चा सुरू आहे. दहिगाव येथील एका 40 वर्षीय व्यक्तीला आज पुन्हा एकदा सर्पदंश झाला. यापूर्वी सुद्धा याचं व्यक्तीला आजपर्यंत सापाने तब्बल 12 वेळा दंश केला असून आज सर्पदंश झाल्याची ही 13 वी वेळ आहे.2017 मध्ये सातव्या महिन्यात या व्यक्तिला तब्बल 10 वेळा सर्पदंश झाला होता. तेव्हा आता पुन्हा हा साप आपला पिच्छा पुरवेल की काय ? अशी भिती सदरील व्यक्ती व त्याच्या कुटुंबास आहे.
गणेश देविदास मिस्तरी (सुतार) रा.दहिगाव ता.यावल (वय 40) असे या एकमेवाद्वितीय व्यक्तीचे नाव आहे.हा व्यक्ती बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास गावातील मागसवर्गीय वस्तीत काम करत होता व लघुशंके करीता तेथील सार्वजनिक शौचालयात गेला असता त्याठिकाणीं सापाने दंश केला सदर प्रकार लक्षात येताच त्याला तातडीने यावल ग्रामिण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यावल रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ. पी.बी.बारेला, अधिपरिचारीका शितल ठोंबरे आणी त्यांच्या सहकाऱ्यां या व्यक्तीवर उपचार केले असून आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
दरम्यान ,या व्यक्तीला यापूर्वी एप्रिल 2017 ते ऑक्टोंबर 2017 सात महिन्याच्या कालावधीत तब्बल 10 वेळा सर्पदंश झाला होता. तेव्हा देखील गावासह संपूर्ण जिल्ह्यात या व्यक्तीवर सापाचा डावतर नाही ना ? सिनेकथांप्रमाणे नागिनचा बदला तर नसेल ना ? अशा विविध चर्चांना उधाण आले होते.नंतर काही महिने हा प्रकार थांबला होता.मात्र आता गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये त्यांना पुन्हा सर्पदंश झाला आणी आता पुन्हा त्यांना बुधवारी सर्पदंश झाल्याने सन 2017 ची पुनरावृत्ती सुरू होते की काय ? अशी भीती मिस्तरी यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त होत आहे. या वारंवार संर्पदंश होण्याच्या प्रकाराची शासनाने दखल घेऊन याबाबत आम्हाला तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे अशी अपेक्षा त्यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त होत आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.