क्राईम

“या” नंबरहून SMS आल्यास सावधान!! अन्यथा तुमचे बँक खाते होईल खाली- दिल्ली सायबर पोलिसनवी दिल्ली 22 मे : दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सायबर क्राईम विभागाने दोन नंबर शेअर करत सर्वांना सावधान राहण्याचा इशारा दिला आहे.देशात सातत्याने सायबर क्राईमच्या (Cyber Crime) घटनांमध्ये वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सायबर गुन्हेगार मंडळी वेगवेगळ्या माध्यमातून सर्वसामान्यांची फसवणूक करत आहेत. त्याचवेळी या नंबरहून आलेल्या SMS मधून फसवणूक होण्याचा धोका आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार KYC मध्ये आलेल्या काही अडचणींमुळे तुमचा नंबर ब्लॉक होऊ शकतो अशी सूचना देणारा SMS या नंबरहून येतो. ही अडचण दूर करण्यासाठी काही नंबरवर फोन करण्याची सूचना या मेसेजमध्ये दिलेली आहे.या मेसेजमध्ये सांगितलेले कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करु नका. त्याचबरोबर कोणतेही पेमेंट करु नका.’ अशी सूचना दिल्ली सायबर पोलिसांनी केली आहे.
Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.