राजकीय

राजकारणात कोणी कोणाचे शत्रू नसतात, पण वैचारिक मतभेद असू शकतात- माजी मंत्री एकनाथराव खडसे

मुक्ताईनगर- राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गेल्या आठवड्यात रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. याभागात शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे केळी पिकांचे नुकसान झालेले आहे. नुकसानग्रस्त भागाचे दौरे करत असताना प्रत्येकाने जाहीर केले की, आम्ही शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देऊ, कुणी म्हणाले की कोकणच्या धर्तीवर मदत मिळवून देऊ, कोणी म्हणाले की मराठवाड्या सारखी मदत देऊ, राज्य सरकारकडे ते मदत मागणार आहे परंतु केंद्रानेही मदत केलीच पाहिजे. हा वादळाचा भाग आहे तोक्ते वादळासाठी पंतप्रधान यांनी गुजरातला मदत केली. मात्र अजून महाराष्ट्राचा दौरा झालेला नाही वादळाने रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. याचा विचार करून पंतप्रधान यांनी तात्काळ मदत करायला हवी आहे अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी केलेली आहेत.
दरम्यान काल मुंबईहून परतल्यानंतर खडसे हे आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते. कोणत्याही स्थितीमध्ये मी आता राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करणार नाही भारतीय जनता पार्टीमध्ये असताना काही विशिष्ट लोकांनी माझा भरपूर छळ केला माझ्यावरती बोगस केसेस केल्या, दाऊदच्या बायकोशी संबंध असल्याचे बनावट प्रकरण घडवून आणून चौकशा करण्यात आल्या. अँटी करप्शनच्या चौकशा करण्यात आल्या ,असे खोटेनाटे खटले माझ्यावरती रचण्यात आले. सत्तेच्या लालसेपोटी एकनाथ खडसे आम्हाला आडवा येऊ शकतो म्हणून माझा छळ केला असा टोला देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता एकनाथ खडसे यांनी लावला आहे.
तसेच सध्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सर्वत्र चर्चा आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलेला आहे घटनेमध्ये तरतूद केलेली आहे की ओबीसीला 50% आरक्षण असले पाहिजे हे आरक्षण रद्द झालं हा एक ओबीसी समाजावर ती अन्याय आहे. यामध्ये राज्य सरकारने ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी समिती गठीत केली आहे अशी प्रतिक्रिया एकनाथराव खडसे यांनी दिलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.