क्राईम

राजकीय पदाधिकाऱ्याने पत्नी व मुलीसह आत्महत्या केल्याने खळबळ

धरणगाव- तालुक्यातील भोद येथील रहिवासी व धरणगाव एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक असलेले आणि भाजपाचे तालुका उपाध्यक्ष यांनी पत्नी व मुलीसह सामुहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक उमदा राजकीय व सामाजिक कार्यकर्ता असा एकाकी सोडून गेल्याने या घटनेने संपूर्ण धरणगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
राजेंद्र रायभान पाटील यांनी पत्नी व मुलगी यांच्यासही शिंदखेडा तालुक्यातील दभाशी नजीकच्या पुलावरून तापीनदीत उडी घेतल्याचे माहिती प्राप्त होत आहे. दोन दिवसांपासून त्यांची गाडी पुलावर बेवारस लागली होती. तालुक्यातील भोद येथील राजेंद्र रायभान पाटील (वय-54) पत्नी सौ.वंदनाबाई राजेंद्र पाटील (वय-48) मुलगी मॕनल राजेंद्र पाटील (वय-21) हे तिघ जण टाटा इंडीका एम एच-19 पी.ऐ-1094 गाडीने दिनांक 17 मे रोजी सकाळी अमळनेर तालुक्यातील भरवस या सासरवाडीला उत्तराकार्याचा कार्यक्रम असल्याने राजेंद्र पाटील पत्नी व मुलीसह सासरवाडीला आले होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.