राजमल ज्वेलर्स फोडले,1लाख 62 हजाराचा माल लंपास
वरणगाव – वरणगाव शहरातील बोदवड रोडवरील राजमल ज्वलर्स दुकानात अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दुकानाचे शटरचे व चॅनेल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.यात दुकानातील चांदी , सोने , मोबाईल असे एकूण एक लाख बासष्ट हजार रुपयाचा ऐवज लांबविण्याची घटना शुक्रवार रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत वरणगाव पोलिसात अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .पुरावा नष्ट करण्यासाठी दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे सुध्दा चोरट्यांनी लांबविले. जळगाव येथील श्वानपथक जंजिर द्वारे तपासणी करण्यात आली. तसेच फिंगर प्रीन्ट घेण्यात आले . मात्र श्वान जंजिर मार्ग दाखवू शकला नाही . पुढील तपास वरणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदिपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखानली फौजदार सुनील वाणी , जळगाव येथील पथक राजू महाजन , साहेबराव चौधरी , निलेश झोपे , गणेश शेळके , अतुल कुमावत आदी करीत आहे .