राजकीय

राजसत्तेच्या माध्यमातून मराठा आरक्षण प्रकरणी कोर्टाच्या अडचणींवर मात करता येईल-ॲड प्रकाश आंबेडकर

पुणे: मराठा समाजाला आरक्षण व न्याय मिळण्यासाठी राज्यभर नेत्यांच्या भेटीगाठी घेत असलेले खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज घटनाकार भारतरत्न डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर तासभर चर्चा केली. आरक्षणाचा गुंता सोडवण्यासाठी कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणे हा एक मार्ग आहे. पहिली याचिका फेटाळल्यानंतर दुसरी याचिका योग्य पुराव्यांसह दाखल करता येते. हा सुद्धा एक मार्ग आहे. पण सत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असे सांगतानाच राजसत्तेसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेले आहे. या भेटीमुळे राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीच्या नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चांनी जोर धरलेला आहे.
बैठकीनंतर या दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी संभाजीराजे छत्रपती यांना बहुजन समाजाचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले. मराठा आरक्षणासाठी आता दोनच संवैधानिक मार्ग आहेत. एक म्हणजे कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणे, दुसरे म्हणजे ही याचिका फेटाळली तर पुन्हा दुसरी याचिका दाखल करणे पण राजसत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. राजकारणात सध्या शिळेपणाला ऊत आलेला आहे. राजकारणात ताजेपणा येण्याची गरज आहे. संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर हा ताजेपणा नक्कीच येईल, असे प्रतिपादन ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.