कायदे

राज्यपाल अनिश्चित काळासाठी निर्णय राखीव ठेवू शकत नाही- मुंबई हायकोर्ट

मुंबई : राज्यपाल कुणालाही उत्तर देण्यास बांधील नाहीत. घटनेने त्यांना दिलेल्या अधिकारामुळे कोर्टही राज्यपालांना विधान परिषदेच्या १२ जागांबाबत निर्देश देऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने आज सुनावणीदरम्यान सांगितले. एकीकडे कोर्टाने या प्रकरणी निर्देश देऊ शकत नाही, असे म्हटले असले तरी परिस्थिती आणि जबाबदारीचे भान ठेवत लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा, असे म्हटलेलं आहे.
या याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने असे म्हटलेल आहे की, राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांचा जागा अनिश्चित काळासाठी रिक्त ठेवू शकत नाहीत. राज्यपालांनी परिस्थिती आणि जबाबदारीचे भान ठेवत लवकरात लवकर निर्णय घ्यायलाच पाहिजे. याबाबत मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात कायम सुसंवाद असायलाच हवा. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला हवे पण,ते परिस्थितीवर अवलंबून आहे.

एकनाथराव खडसेंसह या नावांची आहे चर्चा
महाविकास आघाडीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने 6 नोव्हेंबर 2020 रोजी 12 नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्यात राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांच्या नावाचा तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसैन आणि अनिरूद्ध वनकर आणि शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानुगडे पाटील यांच्या नावांची शिफारस करण्यात आली असल्याची माहिती समोर आलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.