ठाणेपुणेपोलिस प्रशासनमुंबई

राज्यपाल कोश्यारी कोरोनामुक्त तर…वाढत्या हिंसक निदर्शनांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडून अस्थिरता आल्यास राष्ट्रपती राजवट लागू शकते

राज्यपाल कोश्यारी कोरोनामुक्त तर…वाढत्या हिंसक निदर्शनांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडून अस्थिरता आल्यास राष्ट्रपती राजवट लागू शकते

मुंबई – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेच्या निवडणूक निकालानंतर आतापर्यंत तब्बल 40 पेक्षा जास्त आमदारांसह केलेल्या बंडामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झालेला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्याचे चित्र सध्यातरी स्पष्टपणे दिसून येत आहे.या बंडाला भाजपचा पाठिंबा असल्याचा आरोप शिवसेना आणि राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांनी केलेला आहे.
राज्याच्या सत्तेच्या सारीपाटावर आता पुन्हा एकदा सत्तास्थापनेचा नवा खेळ सुरू झाल्याने आजपासून राज्याचे राजभवन आणि राज्यपाल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरणार आहे.काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने ते रूग्णालयात दाखल झालेले होते.आता त्यांची प्रकृति स्थीर झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणी राज्यपाल यांच्यातील आजपर्यंतचे ‘संबंध’ पाहता राज्यपाल यांच्या पुढील भूमिका आणी हालचालींवर आता राज्यासह देशाच लक्षं लागून राहणार आहे.
राज्यात अनेक ठिकाणी तोडफोड व निदर्शने
राज्यात आज मुंबई ,ठाणे ,पुणे ,नाशिकसह अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयांमध्ये काही लोकांनी तोडफोड केल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत.तर काही ठिकाणी या बंडखोर आमदारांचे पुतळे जाळल्याचे दिसून येत आहे.तसेच काही ठिकाणी निदर्शने केल्याने बंडखोर आमदारांचे समर्थक व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थक कार्यकर्ते आमनेसामने आल्याने राज्यात अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झालें आहे. ही तणावाची परिस्थिती आणखी बिघडल्यास राज्यपाल राज्यात सरकार अस्थिर झाल्याचे सांगून एक दिवसाचे अधिवेशन बोलावू शकतात. तसेच कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चिघळल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राज्यपाल हे राष्ट्रपतींना पत्र व्यवहार करू शकतात.
सत्तासंघर्षामुळे वाढती धूसफूस आणी वाढत्या निदर्शनांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये ,यासाठी राज्यातील अनेक ठिकाणी कलम 144 तथा जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.