राष्ट्रीय
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिर्डीत साई दरबारी, राज्यपालांच्या दौऱ्यात ऐनवेळी बदल झाल्याने प्रशासनाची तारांबळ

शिर्डी – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या नियोजित अहमदनगर दौऱ्यात ऐनवेळी बदल करण्यात आला. आज त्यांनी शनिशिंगणापूर ऐवजी अगोदर शिर्डी दौरा केला आहे. त्यानंतर ते शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर पोहोचले. शिर्डीत राज्यपालांच्या दौऱ्यानिमीत्त पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. शिर्डी येथे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी साई दरबारी दाखल होत, साईबाबाचे दर्शन घेतलेले आहे. राज्यपालांनी साईंची पाद्यपुजा केल्यानंतर शिर्डी माझे पंढरपूर ही छोटी आरती केली आणि समाधीचे दर्शन घेतले. मात्र अचानक आलेल्या बदलामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली.