आरोग्य

राज्यातील 80%आॕक्सिजनचा पुरवठा वैद्यकीय वापरासाठीच करण्याचे आरोग्य विभागाचे निर्देश

मुंबई दि:30 संपूर्ण राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना रूग्णांसाठी 80 % ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने आज दिलेले आहेत. तर उर्वरित 20% ऑक्सिजन पुरवठा हा औद्योगिक वापरासाठी असणार आहे.आरोग्य विभागाने याबाबतची अधिसूचना आज जारी केलेली आहे. येत्या 30 जूनपर्यंत राज्यात हे आदेश लागू असणार आहे. संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासत आहे.रोज हजारोंच्या होणारी रुग्णसंख्येची वाढ लक्षात घेता वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनचे उत्पादन अनेक पटीने वाढविण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आलेले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्याकरीता राज्यातील ऑक्सिजन उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
कोरोना रूग्णवाढीमुळे राज्यातील ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा आणि महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियमानुसार आरोग्य विभागाने राज्यात उत्पादित होणाऱ्या एकूण ऑक्सिजन पैकी 80 टक्के आॕक्सिजन वैद्यकीय वापराकरीता तर उर्वरित 20 टक्के औद्योगिक वापराकरीता पुरवठा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. राज्यातील सर्वच कोव्हिड रूग्णालयांसाठी लागणाऱ्या ऑक्सीजन पुरवठ्याला प्राधान्य द्यावयाचे असून वैद्यकीय क्षेत्राला 80 टक्क्यापेक्षा जास्त प्रमाणात ऑक्सीजनची गरज भासल्यास त्याचा पुरवठा तात्काळ करावा असे स्पष्ट निर्देश या अधिसूचनेत देण्यात आलेले आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.