आरोग्य
राज्यात काही ठिकाणी लाॕकडाऊन करावाच लागेल-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाची लस घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना राज्यात लॉकडाऊनसंबंधी मोठं विधान केलेलं आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करावाच लागेल, असे मोठे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल आहे. लोकांनी अनावश्यक गर्दी टाळून मास्कचा वापर करावाच असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केलेले आहे. येत्या दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी आज माध्यमांशी बोलताना जाहिर केलेलं आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाचा फैलाव अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये लाॕकडाऊन लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.