आरोग्य

राज्यात कोरोनाचा उद्रेक !! आज कोरोनाचे तब्बल 227 बळी

मुंबई दिः31 राज्यात आज तब्बल 227 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झालेली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 1.94 % एवढा आहे. महाराष्ट्रात आज 23600 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले असून राज्यात आजपर्यंत एकूण 24,00,727 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.34 % एवढे झालेले आहे. आज राज्यात 39544 नवीन कोरोनाबाधीत आढळलेले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 197,92,143 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 28,12,980 (14.21 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 17,29,816 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 17863 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.अशी माहिती आज राज्याच्या आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.