राज्यात कोरोनाची दुसरी लाट सदृश्य परिस्थिती – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

मुंबई दि : 16- महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलेले आहे. याबाबत एक पत्र केंद्रीय समितीने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठविलेले आहे. केंद्रीय सचिव राजेश भूषण यांनी लिहिलेल्या या पत्रात राज्यात कोरोना स्थितीवर ठोस पावले उचलली जात नसून रात्रीच्या संचारबंदीचा कोरोना प्रसारावर ठोस परीणाम होत नसल्याची टिप्पणी देखील केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी केंद्रीय समिती कोरोना उत्पत्ती व प्रसाराचा अभ्यास करण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आली होती. त्यावेळी कोरोना प्रतिबंधक विषयक सुविधांचा आढावा या समितीने घेतलेला होता.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात राज्यात वाढत्या कोरोना रूग्ण संख्येवरून दुसऱ्या लाटेची ही सुरूवात झाली असण्याची शक्यता असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये वाढत्या कोरोनासंदर्भात सूचित केलेले आहे. दोन आठवड्यांपूर्वी 7 मार्च ते 11 मार्च दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची एक टीम राज्याच्या दौऱ्यावर आली होती. या टीमने 8 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा देखील केली होती.
काल राज्यात 15051 कोरोना बाधितांची नोंद झाली. तर 48 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
तसेच रिकव्हरी रेट 92.07 टक्क्यांवर आलेला आहे.
केंद्राच्या टीमने मुंबईतील एस आणि टी वॉर्डमध्ये तसेच ठाणे, नाशिक, जळगाव , धुळे ,औरंगाबाद, याठिकाणी पाहणी केलेली होती. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि आयसोलेशन-क्वारंटाईन फॅसिलिटीज ट्रीटमेंटची काय परिस्थिती आहे याचे निरीक्षण या पथकाने घेतले होते.