कृषि

रावेर तालुक्यात वादळाच्या तडाख्याने केळी बागा उद्धस्त, अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली

रावेर दि-27- आज तालुक्यात दुपारी आलेल्या वादळाच्या तडाख्याने तालुक्यातील ऐनपूर , विटवा, निंबोल सह परिसरात जबरदस्त गारपीट होऊन केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या अस्मानी संकटाने हजारो शेतकऱ्यांच्या करोडो रुपयांच्या केळी बागा जमीनदोस्त झालेल्या आहे. अनेक ठिकाणी वादळाच्या तडाख्याने घरांवरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झालेले आहे. सुलवाडी व चिंच फाटा या रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक देखील ठप्प झाली आहे. तापी परीसरातील हिरव्या पट्ट्यात यामुळे केळी उत्पादकांचे कंबरडे मोडलेले आहे. या वादळाच्या तडाख्याने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील ऐनपूर, निंबोल, विटवा, खिर्डी, रेंभोटा, सुलवाडी,वाघाडी, यागावांसह सभोवतालच्या परिसरात आज दुपारी झालेल्या प्रचंड वादळाने अनेक केळी बागा जमिनदोस्त झालेल्या आहे. यामुळे या भागातील हजारो शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान वादळाने अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहे.वादळाने अनेक ठिकाणी वीज तारांवर तर काही ठिकाणी वीज ट्रान्सफरवर झाडे उन्मळून पडल्याने या भागातील वीज पुरवठा खंडित झालेला आहे. तो पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.