निवडणूकराजकीयराष्ट्रीयसोलापूर

राष्ट्रपतीपदाच्या उमेद्वारीसाठी महाराष्ट्रातील “या” दिग्गज नेत्याच्या नावाची आज दिल्लीत चर्चा सुरू

राष्ट्रपतीपदाच्या उमेद्वारीसाठी महाराष्ट्रतील “या” दिग्गज नेत्याच्या नावाची आज दिल्लीत चर्चा सुरू

नवीदिल्ली – राज्यात आज विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत असताना दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी देखील काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. येत्या 18 जुलैला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीत भाजपला घेरण्यासाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. भाजपच्या विरोधातील जवळपास सर्वच पक्ष या निवडणुकीत एकत्र आलेले असल्याचे चित्र दिसत आहे. या विरोधकांनी सर्वानुमते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव सुचवलं होतं. पण शरद पवारांनी तो प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला होता. त्यानंतर विरोधकांकडून आता महाराष्ट्रातील आणखी एका दिग्गज नेत्याला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याबाबतची चर्चा आता दिल्लीत सुरु आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना विरोधकांकडून उमेद्वारी दिली जाऊ शकते. त्यासाठी तशा वेगवान हालचाली देखील घडताना दिसत आहेत.


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचा उमेदवार शोधण्याची प्रक्रिया संयुक्त पुरोगामी आघाडीतील घटक पक्षांकडून सुरु आहे. विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. सुशीलकुमार यांचा राजकीय अनुभव दांडगा आहे. त्यांनी यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदही भुषवलेले आहे. याशिवाय त्यांनी देशाचे केंद्रीय गृहमंत्री म्हणूनही यशस्वी धुरा सांभाळली आहे.गेल्यावेळी भाजपने दलीत उमेद्वार म्हणून रामनाथ कोविंद यांना उमेद्वारी देऊन निवडून आणले आहे. तशाच प्रयोगाची चाचपणी कॉंग्रेससह संयुक्त पुरोगामी आघाडी यावेळी करून शिंदे यांचा राजकीय अनुभव आणी दलीत उमेद्वार पाहता विरोधकांकडून सुशीलकुमार यांना उमेदवारी देण्याबाबत खलबते सुरू आहेत.


यापूर्वी कांग्रेसच्या अध्यक्षपदासाठी देखील सुशीलकुमार शिंदेंच नाव चर्चेत आलेलं होत. विशेष म्हणजे 2002 मध्ये भैरोसिंग शेखावत यांच्याविरूद्ध उपराष्ट्रपती पदासाठी सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे यावेळी विरोधकांकडून सुशीलकुमार शिंदे यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जावू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.