राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसचा लाॕकडाऊनला विरोध – नवाब मलिक

मुंबई दि:29 राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत असून त्यासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने राज्यात कडक लॉकडाऊन करण्यास विरोध केलेला आहे.याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच राष्ट्रवादीने लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजप पाठोपाठ महाविकास आघाडीच्या सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादीने थेट लॉकडाऊनला विरोध केल्याने मुख्यमंत्र्यांची लाॕकडाऊनच्या निर्णयाबाबत चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लॉकडाऊन बाबतची राष्ट्रवादीची भूमिका आज स्पष्ट केलेली आहे. राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने काल झालेल्या बैठकीत लॉकडाऊनचा विचार सूचविण्यात आलेला आहे. पण लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. तसा आग्रहच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आला आहे, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केलेले आहे.

आरोग्य सुविधा वाढवा
लॉकडाऊन हा राज्यातील सामान्य माणसाला परवडणारा नाही. त्यामुळे तो पर्याय होऊ शकत नाही. त्याऐवजी आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर देण्यात यावा अशी आमची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनीही प्रशासनाला आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना केलेल्या आहेतच परंतु लोकांनी सुद्धा अजून जास्त काळजी घेतली पाहिजे.कोरोना प्रतिबंधक नियम पाळल्यास कोरोना वाढणार नाही, असेही मलिक यांनी “टिव्ही9 मराठी” या वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.