राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसचे रविंद्रभैय्या पाटील यांना मनूरमध्ये धक्का;बंधूंचे पॅनल पराभूत

बोदवड: सर्वांचे लक्ष लागून असलेल्या बोदवड तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निकला आज दि. १८ रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्रभैय्या पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला असून प्रस्थापितांचा पराभव करत अनेक नवखे उमेदवार निवडणुकीत विजयी झालेले आहे.ॲड रवींद्रभैय्या पाटिल यांचा पुतण्या सम्राट पाटील यांच्यासह पॅनल पराभूत झाल्याने जिल्ह्यातील राजकारणात सर्वात धक्कादायक निकालाची नोंद होऊन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेले आहे.
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात ॲड रवींद्रभैय्या पाटील यांचे मोठे प्रस्थान असून हल्ली त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हे पद आहे. जिल्ह्यासह बोदवड तालुक्यात त्यांचे वर्चस्व असून बोदवड तालुक्यात त्यांचा मोठा समर्थक वर्ग असून मनूर बुद्रुक हे त्याचं होम पीच आहे. या ग्रामपंचायतीवर त्यांच निर्विवाद वर्चस्व राहिलेले आहे. त्याचे बंधू पंजाबराव पाटील गावचे माजी सरपंच राहून चुकले आहे. या निवडणुकीत पंजाबराब पाटील यांचा मुलगा तथा ॲड रवींद्रभैय्या पाटील यांचे पुतणे सम्राट पाटील यांच्या सह पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होते. माजी सरपंच पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल निवडणूककीच्या रिंगणात होते.
त्यानुसार आज दि.18 रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर ॲड रवींद्रभैय्या पाटील यांचे पुतणे सम्राट पाटिला यांचा 126 मतांनी दारुण प्रभाव होत एक उमेदवार वगळता संपूर्ण पॅनल पराभूत झालेले आहे. एकूण 11 जगासाठी या ठिकाणी निवडणूक घेण्यात आली होती. दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसे याचा राष्ट्रवादी प्रवेशामुळे स्थानिक निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदा होईल असे वाटत असतानाच ॲड रवींद्रभैय्या पाटील यांना त्याच्या गावांत पराभवास सामोरे जावे लागत आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
बोदवड तालुक्यातील अनेक दिग्गजांचा पराभव
यासह या निवडणुकीत नाडगाव येथे माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे भाचे तथा माजी पं.स. सदस्य विरेंद्रसिंग पाटील याच्या पत्नी रंजनकौर पाटील या ईश्वर चिठ्ठीत पराभूत झाल्या. यासह वाकी येथे पं.स. सदस्य गणेश पाटील यांच्या आई विमल बाई पाटील सह पॅनल पराभूत झाले आहे. मनूर खु येथें माजी सरपंच ईशवर जंगले यांच्या पत्नी प्रमिला जंगले यांच्यासह पॅनल, साळसींगी येथे माजी पं.स. सभापती राजधर बीजागरे हे स्वतः पराभूत झाले आहे. त्याचे पॅनल देखील पराभूत झाले आहे. यासह आदर्श गाव मानमोडी येथील 15 वर्ष सरपंच पद भूषविलेले सतीश पाटील व त्यांच्या पॅनलचा दारुण पराभव झालेला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.