राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे निराधारांना नववर्षानिमित्त शाल व ब्लँकेटचे वाटप
जळगाव – सालाबादप्रमाणे 31 डिसेंबर जल्लोषात साजरा न करता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रेरणेतून राष्ट्रवादी युवती काँग्रेस तर्फे उघड्यावर राहणाऱ्या निराधार वयोवृद्ध नागरिकांना थंडी पासून बचावासाठी उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले आहे.
दरवर्षी 31 डिसेंबर म्हणजे तरुणाईसाठी मोठा उत्सव असतो,यंदाचं वर्ष मात्र कोरोनामुळे अनेकांसाठी मोठ्या अडचणीच ठरलेल आहे. त्यात ज्यांच कोणी वाली नाही अशा निराधार जनतेसाठी तर आणखीनच अडचणीच झालेल आहे.त्यात डिसेंबर अखेरीस थंडीचा जोर वाढल्याने या रस्त्यावर वास्तव्य करणाऱ्या बेघर नागरिकांना येणाऱ्या अडचणीची जाणीव झाल्याने राष्ट्रवादी युवती काँग्रेस तर्फे अशा गरजूंना मदत म्हणून उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस युवती शहर महानगराध्यक्ष आरोही नेवे यांच्या सह ग्रामीण कार्याध्यक्ष कोमल पाटील, किरण तायडे शहर कार्याध्यक्ष ,पूर्वा भावसार,विधी शुक्ला यांनी हा उपक्रम राबविला आहे. ऐन थंडीच्या मोसमात गरम कपडे मिळल्यानं अनेक निराधार वृद्धांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करत या तरुणींच तोंडभरून कौतुक करीत भविष्यात आणखी असे समाजसेवी उपक्रम घडो यासाठी आशीर्वाद दिलेले आहेत.या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.