आरोग्य
राहते घरी गळफास घेऊन एकाची आत्महत्या

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरातील गिरडरोड वरील मिलिंद नगर येथील रहिवाशी संदिप सुधाकर कोतकर (वय – 40 ) या इसमाने आपल्या राहत्या घरी घरात कोणीही नसतांना गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना दि.20 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. संदिप कोतकर हे खाजगी वाहनचालक असुन त्यांचे आत्महत्येचे कारण अद्याप समजु शकलेले नाही. संदिप कोतकर यांचे पश्चात आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, दोन बहीणी असा मोठा परिवार आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.