क्राईम

रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसाला पळविले,रिक्षा पलटी

जळगाव – थांबा नसलेल्या ठिकाणी रिक्षा का लावली ? याचा जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाशी झालेल्या बाचाबाची नंतर रिक्षा पोलीस स्थानकात नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यालाच रिक्षा चालकाने पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना जळगाव शहरात घडल्याने मोठी खळबळ उडालेली आहे.
या घटनेत रिक्षा चालकाच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याच काम आता सुरू आहे.
कमलाकर बडगुजर हे वाहतूक शाखेत पोलीस शिपाई आहेत. संध्याकाळच्या वेळेस त्यांची सुभाष चौक परिसरात वाहतुक सुरळीत करण्याची ड्युटी लावलेली होती ,याच ड्युटी दरम्यान एका रिक्षा चालकाने थांबा नसलेल्या ठिकाणी रिक्षा उभी केल्याच त्यांच्या लक्षात आल्यावर, त्यांनी त्याला रिक्षा या ठिकाणी का उभी केली याचा जाब विचारला असता रिक्षा चालक आणि पोलीस कर्मचारी कमलाकर बडगुजर यांच्यात काही वेळ बाचाबाची झाली ,या घटने नंतर ही रिक्षा चालक ऐकत नसल्याने बडगुजर यांनी रिक्षा चालकास वाहतूक पोलीस शाखेत रिक्षा जमा करण्यास सांगितले आणि बडगुजर हे स्वतः त्या रिक्षात बसले,बडगुजर स्वतः रिक्षात बसल्याने रिक्षा चालक हा वाहतूक शाखेत रिक्षा घेऊन जाईल अशी त्यांना अपेक्षा होती,मात्र रिक्षा चालकाने त्यांना वाहतूक शाखेत न नेता सिंधी कॉलनी रस्त्याने आपल्या घराकडे रिक्षा नेण्यास सुरुवात केली, यावेळी रिक्षा चालकाने वेग वाढविल्याने पुढील अनर्थ होण्याची शक्यता पाहता पोलीस कर्मचारी बडगुजर यांनी आपल्या मोबाईल मध्ये या घटनेचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली ,याच दरम्यान रिक्षा पलटी झाली ,पोलीस कर्मचाऱ्याने रिक्षा पलटी केल्याचा आणि अरेरावी केल्याचा आरोप रिक्षा चालकाने केला आहे तर रिक्षा चालकाने स्वतःच रिक्षा पलटी करून घेतल्याचा आरोप पोलीस कर्मचाऱ्याने केला आहे ,या घटनेत रिक्षा चालकास काही ठिकाणी मार लागला आहे तर बडगुजर याना मात्र कोणतीही दुखापत झाली नसल्याने बचावले आहेत.
या घटनेचे मोबाईल चित्रण बडगुजर यांनी स्वतः माध्यमांना पुरवीत आपल्यावर बितलेली आपबीती कथन केली आहे.
या घटने बाबत जळगाव शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच काम आता सुरू असून रिक्षा चालका वर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.